आता आठवीपर्यंत ढकलपास करण्याची पद्धत कायमची बंद!! अनेकांना वाचायलाही जमेना, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…

पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून आता अनेक बदल करण्यात आले आहेत. आता पाचवी व आठवीच्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील या इयत्तेतील विद्यार्थ्यांची पारदर्शकपणे परीक्षा घेतली जाते का?, यावर लक्ष अअसणार आहे.
यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत आता बदलली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे बंद झाले आहे. गुणवत्ता ढासळली असल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांना वाचायला देखील येत नाही.
आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शकपणे घेतली का? उत्तरपत्रिकांची तपासणी व गुणदान बिनचूक आहे की नाही?, याची पडताळणी आता ‘डायट’चे अधिकारी व शिक्षणाधिकारी करणार आहेत. याची पडताळणी प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या (डाएट) माध्यमातून होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी पाच ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना अंक ओळख, वजाबाकी, भागाकार देखील येत नसल्याची बाब समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
अनेकांना वाचायला देखील जमत नसल्याचे या सर्व्हेतून उघड झाले. तसेच सरकारी शाळांमधील प्रवेश देखील गुणवत्तेच्या कारणामुळे घटल्याची बाब स्पष्ट झाली. आता एप्रिलमध्ये या विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. त्यात अनुत्तीर्ण झालेल्यांची पुढे मे-जून महिन्यात फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
याही परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी त्याच वर्गात राहणार असून त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. शाळांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या इयत्तेत पुढे जाताना त्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार व्हावा, यासाठी आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ढकलपास पद्धत करण्यात आली आहे.