महाभारतातील लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी..

मुंबई : टेलिव्हिजन विश्वासवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीआर चोप्रांच्या महाभारतातली कुंतीपुत्र कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी दुजोरा दिला आहे.

वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व शोकसागरात बुडालं आहे. त्यांनी साकारलेला ‘कर्ण’ आजही लाखो प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होते. काही काळ त्यांनी आजारावर मात केली होती, मात्र अलीकडे पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांची प्रकृती बिघडली. अखेर बुधवारी (ता.१५) सकाळी ११.३० वाजता त्यांचे निधन झाले.

महाभारतात अर्जुनाची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही दुःखद बातमी दिली. त्यांनी लिहिलं, “गुड बाय जेन्टलमन, तुझी खूप आठवण येईल पीडी.
पंकज धीर यांनी आपल्या आयुष्यात अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. पण ‘महाभारतातील कर्ण’ ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय भूमिका ठरली. त्यांच्या संवाद , भावनांचा आविष्कार आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी हा पौराणिक पात्र खऱ्या अर्थाने जिवंत केला.
पंकज धीर यांनी काही महिन्यांपूर्वी मोठी सर्जरीही केली होती. आजाराशी लढताना ते मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर राहिले. मात्र, अखेरीस या लढाईत त्यांनी माघार घेतली. त्यांच्या जाण्याने दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील एक तेजस्वी पर्व संपल्याची भावना चाहत्यांमध्ये व्यक्त होत आहे.
पंकज धीर यांनी टीव्ही आणि सिनेक्षत्रात अनेक प्रोजेक्ट्स केलेत. दरम्यान, १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या बीआर चोप्रांच्या महाभारत या मालिकेनं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्यानं कर्णाची भूमिका साकारलेली. त्यानं ज्या गांभीर्यानं ही भूमिका साकारली, त्याचं उदाहरण आजही दिले जाते/
कर्णाची भूमिका साकारल्यानंतर त्यांना कर्ण म्हणूनच ओळखलं जाऊ लागले. टीव्ही शो व्यतिरिक्त, पंकजनं चित्रपटांमध्येही काम केलं. ते चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा यासारख्या अनेक पौराणिक शोचा भाग होते. त्यांनी सोल्जर, बादशाह आणि सडक यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
