दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग ; ठाकरेंच्या दौऱ्याआधीच त्यांचा खास माणूस पंतप्रधानांच्या भेटीला ; भेटीचं कारण काय?


पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ते दिल्लीत पोहचणार असून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी त्यांना भोजनाच आमंत्रण देखील देण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याआधीच राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. या भेटीचे फोटोही समोर आले होते. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. यावर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी स्पष्टीकरण दिल आहे. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेली भेट ही सहज होती.त्या भेटीमागचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. त्या भेटीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झाली नाही तशीच माझी भेट राजकारणाशी संबंधित नव्हती असं त्यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची बैठक आता दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यासोबत त्यांचीं बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीत काय चर्चा होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!