राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप आमदाराकडून एकनाथ खडसेंवर अनेक महिलांशी अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप..

जळगाव : भाजप आमदारांनी एकत्र येत जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आणि चर्चांना उधाण आले आहे. यामुळे खडसे याला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत मंगेश चव्हाण म्हणाले, यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले. मी हे जबाबदारीने तुम्हाला सांगतो आहे. जसं तुम्ही लोढाचं सांगितलं, लोढाने तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करत आहात, तुमच्याविरोधात देखील मला अशाच काही लोकांनी येऊन सांगितलं आहे, की एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते.
त्या महिला रात्री यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता, असे मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं आपल्याला सांगणं आहे. तुमच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीने मला काही गोष्टी सांगितल्या, त्याची जर मी जाहीर वाचता केली, तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे अतिशय खालच्या स्तराचा विचार करणारे नेते आहेत. मी त्यांना अतिशय जवळून पाहतो. वीस वर्षांच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवले. जवळच्या लोकांना यांनी संपवले. दरम्यान, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अनेकदा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
यामुळे याठिकाणी अनेक आमदार एकत्र येत त्यांनी खडसे यांच्यावर गंभीर आरोप केलं आहेत. यामुळे आता वातावरण तापले आहे. या आरोपांमुळे जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे, कारण हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. यावर खडसे काय प्रतिक्रिया देणार हे लवकरच समजेल.