समोसा ठरले कारण!! हिमाचलमध्ये राजकीय वातावरण तापलं, थेट CID चौकशी, नेमकं काय घडलं?

हिमाचल : हिमाचल प्रदेशच्या राजकारण समोसे वाटप प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी पाच पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश थेट राज्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग ( देण्यात आले आहेत. दरम्यान, विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखू यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आपल्या जेवण्याची काळजी आहे, असा टोला लगावला आहे.
नेमकं घडलं काय?
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे २१ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयातील सायबर विंग स्टेशनच्या उद्घाटनासाठी गेले होते. येथील पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यांना माहित नव्हतं की, मुख्यमंत्री सुखू हे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात नाहीत. त्यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाला एका हॉटेलमधून मुख्यमंत्री व त्यांच्या बरोबर असणार्या ‘व्हीआयपींसाठी समोसे आणि केक आणण्याची सूचना केली. मात्र तीन बॉक्स समोसे आणि केक हे मुख्यमंत्री सुखूंच्या सुरक्षा कर्मचार्यांना देण्यात आले. अल्पोपहारापासून ‘व्हीआयपी’ वंचित राहिले.
पोलीस अधीक्षक विक्रम चौहान यांनी त्यांच्या तपास अहवालात लिहिले आहे की, पोलीस महानिरीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षकांनासमोसे आणि केक आणण्यास सांगितले होते. त्यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना खाद्यपदार्थ आणण्याची सूचना केली. एएसआय आणि हेड कॉन्स्टेबलने हॉटेलमधून तीन सीलबंद बॉक्समध्ये सामोसे आणले.
या हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्री सुखू व त्यांच्या बरोबर असणार्या ‘व्हीआयपींसाठी असताना त्याचे वाटप सुरक्षा कर्मचार्यांना करण्यात आले. पाच पोलिस अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन केले नाही. व्हीआयपींना अल्पोपहारापासून वंचित ठेवले त्यामुळे या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी पाच पोलीस कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.