भाजपच्या बड्या नेत्याच्या पुतण्यासह तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं कारण काय?

नाशिक : गंगापूरच्या विसे मळा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल, पप्पू जाधव व एका अन्य आरोपीला अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी मामा वाल्मिक उर्फ बाबासाहेब राजवाडे आणि इतरांना अटक करण्यात आली होती.
मात्र, मुख्य आरोपी तुकाराम चोथवे आणि अजय बोरीसा हे अद्यापही फरार आहेत. नाशिकमध्ये सध्या पोलिसांकडून ऑपरेशन क्लीन अप सुरू आहे. ऑपरेशन क्लीन अपचा आज पाचवा दिवस. पोलिसांनी या कारवाईत भाजप नेते सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे.
विसे मळा गोळीबारप्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते सुनील बागूल यांचे समर्थक मामा राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयात हजर होण्यापूर्वी राजवाडे यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत न्यायालयात तसा अर्ज सादर केला. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही.
गंगापूर नाका गोळीबारप्रकरणी अजय बागुलसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल यांच्यासह तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, याआधी या प्रकरणी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मामा राजवाडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांचीही सध्या चौकशी सुरू आहे. दोन बड्या भाजप पक्षाच्या निगडीत व्यक्तींना ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.