पुण्यात खळबळ! लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार, तरुणीचे ‘ते’ फोटो थेट आईला पाठवले अन्..
पुणे : लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका तरुणाने वीस वर्षीय तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवले. इतकंच नाही तर आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली.
लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी एकवार गुन्हा दाखल केला आहे. अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती.
पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी तरुणी ही जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्या आईच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सॲपवर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ पाठवले.
आरोपीने फिर्यादीच्या आईला मेसेज करुन मी तुझ्या मुलीला आणि मुलाला ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.