कोयता गँग विरोधात पोलीस आक्रमक! पुणे शहरात धडक कारवाई करत ३४ गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या…!
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत वाढली आहे. यामुळे दहशद निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस आता अनेकांवर कारवाई करत आहेत. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी धडका सुरु केला आहे.
यामुळे कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन पोलीस जबर कारवाई करत आहे. आता पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी १९ ते २० जानेवारीच्या मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. यामध्ये अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील तीन हजार ६८३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७०९ गुन्हेगार त्यांच्या वास्तव्यास दिसून आले आहे.
त्यापैकी गंभीर गुन्ह्यातील ३४ जणांना बेकायदा अटक केली. त्यात आठ तडीपार गुन्हेगारांचा समावेश आहे. यामुळे आता यावर आळा बसणार की नाही हे येणाऱ्या काळात समजनार आहे.