पुण्यात भर गर्दीच्या रस्त्यावर पीएमटीचा ब्रेक फेल ; प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण

पुणे : पुणे शहरातील वाहतुकीची समस्या हा मोठा गंभीर विषय आहे पुण्यातील रस्ते आणि वाहनांची संख्या यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो अशाच परिस्थितीत एखादी मोठी दुर्घटना होणे टळल्याची घटना समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ बसचे भर रस्त्यात अचानक ब्रेक फेल झाले आणि काही क्षणातच संपूर्ण रस्त्यावरील परिस्थिती चिघळू शकली असती. मात्र, या संकटकाळात बसचा चालक आणि वाहक यांनी जे प्रसंगावधान दाखवले.

दरम्यान ही घटना नेमकी पुणे शहरातील नेमकी कुठल्या परिसरातील आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, हा प्रसंग सकाळी घडल्याने सर्व परिसर गजबजलेला होता. या गर्दीतूनच एक बस जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला. बस पुढे जात राहिली आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न बस चालकाने आणि कंटक्टरने केला.बसमध्ये अनेक प्रवासी असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
बसचालकाने आपले भान न गमावता बसला एका बाजूला वळवून थांबवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. कंडक्टरही प्रवाशांना धीर दिला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
