आता AC बसमधून करा पुणे दर्शन, PMPML ची नवीन योजना सुरू, जाणून घ्या दर आणि मार्ग


 

पुणे : पीएमपीएमएलने नागरिकांसाठी एक पर्यटन बस सेवा सुरू केली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी 1 मे 2023 पासून पीएमपीएमएल खास वातानुकूलित पर्यटन बस सेवा सुरू केली आहे.

यामुळे पर्यटन करणारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या बस शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कार्यरत असणार आहेत. या सेवेसाठी प्रत्येकी प्रत्येक मार्गावर वेगवेगळे दर असतील.

तिकीटाच्या किमतींमुळे या सेवेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. सोशल मीडियावर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने, पीएमपीएमएलने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी माहिती दिली आहे. सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ
हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

सुटण्याचे ठिकाण : हडपसर गाडीतळ
हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर
मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

सुटण्याचे ठिकाण : डेक्कन जिमखाना
डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

सुटण्याचे ठिकाण : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन
तिकीट दर- 700 रुपये प्रति प्रवासी

सुटण्याचे ठिकाणी : पुणे स्टेशन मोलेदिना स्थानक
पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली). वाडेबोल्हाई छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन
तिकीट दर- 1000 रुपये प्रति प्रवासी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!