स्वारगेट घटनेनंतर महिला सुरक्षेसाठी पीएमपीएलचा मोठा निर्णय, महिलांना त्रास दिल्यास थेट….

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे प्रशासनावर टीका केली जात आहे. यामुळे आता महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या घटना कमी होतील.
आता बसमध्ये महिला प्रवाशांना त्रास दिल्यास, बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात बस घेऊन जाऊन तक्रार दाखल करावी, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. अनेकदा महिला प्रवाशांसाठी आरक्षित जागांवर टवाळखोर बसतात आणि त्यांना उठवताना वाद घालतात. महिला वाहक किंवा प्रवाशांनी विरोध केला तर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे वाद होतो.
अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पीएमपीचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासन सतर्क झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. याठिकाणी आता रात्रीचे देखील पोलीस तैनात असणार आहेत.
बसस्थानकांवर आणि आगारांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेशही दिले गेले आहेत. तसेच रात्री आणि दिवसा कोणाला याठिकाणी काम नसताना वावरता येणार नाही. पुण्यातील घटनेनंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता या घटना कमी होणार का? हे येणाऱ्या काळात समजणार आहे.