PM Modi : आता शरद पवारांना शिक्षा देण्याची वेळ आलीय! मोदींचा नाव न घेता हल्लाबोल, म्हणाले, माढ्यात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून…

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची माळशिरस येथे सभा होत आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला.
सभेत सुरुवातीलाच मोदी यांनी पाण्यावरून शरद पवार यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राची जनता आशीर्वाद देताना कोणतीही कसर ठेवत नाही. जे लोक वचन पूर्ण करत नाहीत, त्यांचा हिशेबही महाराष्ट्रातील जनता बरोबर करते. त्यांना बरोबर लक्षात ठेवते.
तसेच मोदी म्हणाले, एक मोठा नेता 15 वर्षांपूर्वी माढ्यात निवडणूक लढविण्यासाठी आला होता. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी पोचविण्याची शपथ घेतली होती. त्याच काय झालं.
त्यांनी या ठिकाणी पाणी पोचवले नाही, हे तुमच्या लक्षात असेलच. त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे, त्या मोठ्या नेत्याने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे धाडस दाखवले नाही. आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असेही मोदी म्हणाले. PM Modi
दरम्यान, मोदी असेही म्हणाले की, मी वेळेत येतो, दूरवरून येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, त्यामुळे मला क्षमा करा. काही राजकीय नेत्यांनी सभेला उशीरा येण्याची फॅशन केली होती. काही लोक अजूनही येत आहेत, त्यांची मी माफी मागतो.
असेही म्हणत त्यांनी लोकांची माफी मागितली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत, अनेक ठिकाणी ते सभा घेत आहेत. ते सगळ्या सभेत शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत.