PM Modi : …..म्हणून काश्मिरी हिंदू बेघर!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट घणाघात

PM Modi : जम्मू-काश्मीरमध्ये २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. या कालावधीत बुधवारी २४ जागांवर मतदान झाले. या जागांवर सुमारे ६१.३ टक्के मतदान झाले. गेल्या सात निवडणुकांच्या तुलनेत येथे सर्वाधिक मतदान झाले.
आता सर्वच राजकीय पक्ष दुसऱ्या टप्प्याच्या तयारीत व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित केले आहे.
काश्मिरी पंडितांनी काश्मिरचे पालनपोषण आणि संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे; परंतु येथील तीन कुटुंबांच्या स्वार्थी राजकारणामुळे काश्मिरी हिंदूंना त्यांच्या घरातूनच बेघर केले.
शीख कुटुंबांवरही अत्याचार झाले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबाेल केला. आज गुरुवारी (ता.१९) श्रीनगरमधील जाहीर सभेत ते बाेलत हाेते. PM Modi
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, काश्मिरी हिंदू आणि शीख बंधू-भगिनींवर झालेल्या प्रत्येक अत्याचारात तीन कुटुंबे आणि त्यांच्या लाेकांचा सहभाग आहे. काँग्रेस-एनसी-पीडीपीने फक्त जम्मू काश्मिरमध्ये विभाजन केले. मात्र भाजप सर्वांना एकत्र करत आहे. आम्ही ‘दिल’ आणि दिल्लीमधील अंतर कमी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आता काश्मीरमधील मुलांच्या हातात दगडं नाही, तर पेन आणि पुस्तकं
दहशतवादावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्याचा, जम्मू-काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला रोखण्याचा, येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आमचे वचन आहे.
त्यामुळे येथील आणखी एक पिढी आम्ही तीन राजघराण्यांच्या हातून नष्ट होऊ देणार नाही. जम्मू काश्मीरमध्ये मी मनापासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहे, आज संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत, मुलांच्या हातात दगड नाहीत, तर त्यांच्याकडे पुस्तके आणि लॅपटॉप आहेत.