PM Modi : अखेर राज्याचा मुख्यमंत्री ठरला!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘या’ नावाला पसंती…


PM Modi : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आली आहे.

तसेच आता मुख्यमंत्री पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतच पंतप्रधानांचीही फडणवीस यांच्या नावाला पसंती असून शुक्रवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. PM Modi

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची नियुक्ती होईल, याबाबतचा पेच निकालानंतर चौथ्या दिवशीही कायम असून, याबाबत भाजप हायकमांडने काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे कळते. एकनाथ शिंदे हे आता राजीनाम्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत.

नव्या सरकारच्या प्रतीक्षेत राज्यातील जनता, सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते आहेत. भाजप मुख्यमंत्रिपदावर ठाम असून, २ डिसेंबरपूर्वी राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्याची चिन्हे नसल्यामुळे मुंबईत आलेले सत्तारूढ पक्षाचे आमदार आता आपापल्या मतदारसंघांत परतू लागले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!