Pm Modi : श्रीराम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ११ दिवसांचे अनुष्ठान, आज नाशिकमधून केली सुरवात..

Pm Modi : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना एक खास संदेश दिला. एका ऑडिओ मेसेजद्वारे देशातील नागरिकांना संबोधित करत मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान आजपासून सुरू करत असल्याचे सांगितले आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी आयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेला केवळ ११ दिवस उरले आहेत.
या शुभ सोहळ्याचा मी देखील साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. परमेश्वराने मला या अभिषेक दरम्यान भारतातील सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवले आहे. हे लक्षात घेऊन मी आजपासून ११ दिवसांचे अनुष्ठान विधी सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. Pm Modi
या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे. असे ते म्हणाले, तसेच पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील यम नियमांचे पालन करून अनुष्ठान करणार आहे. त्याआधी त्यांनी दिलेल्या या संदेशाची जोरदार चर्चा होत आहे.