PM Kisan Nidhi : मोदींचा शपथविधी झाला अन् दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा..!!

PM Kisan Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. रविवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताना पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मोदी ३. ० सरकारच्या पहिल्याच दिवशी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हप्ता सोमवारी जारी करण्यात आला आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. PM Kisan Nidhi
तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतक-यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू. यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, १६ व्या हप्त्याचे पैसे २८ फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतक-यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते.
देशातील शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतक-यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.