Pune Crime : पिटी शिक्षकाची काळी नजर, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षकावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune Crime पुणे : शारीरीक शिक्षणाच्या क्लास दरम्यान शिक्षकाने १० वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २६ ऑगस्ट पर्यंत घडली.
एका मुलीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संजय देशमुख (रा. दादाची वस्ती, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी हा लोहगाव येथील शाळेत शारीरीक शिक्षणाचे शिक्षक आहेत. फिर्यादी यांची १० वर्षाची मुलगी शाळेमध्ये असताना दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्पोर्टस क्लासचे वेळी मैदानावर त्याचे एल्बोने मुलीच्या शरीराला वाईट उद्देशाने हात फिरविला.
तसेच तिच्या मैत्रिणीच्या शरीराला वाईट उद्देशाने स्पर्श करुन तिला पीटी क्लास कसा वाटला, असे विचारुन अश्लिल कृत्य केले. पोलीस उपनिरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.
Views:
[jp_post_view]