Pimpri Crime : पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय, मित्राला गाडीवर बसवून मुळशी धरणाजवळ नेलं अन्.., धक्कादायक घटनेने उडाली खळबळ


Pimpri Crime  पुणे : पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून मित्राच्या मानेवर आणि चेहेऱ्यावर विळ्याने वार करून मृतदेह मुळशी धरणात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मुळशी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Pimpri Crime

किशोर प्रल्हाद पवार (वय. ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय भास्कर खिल्लारे (वय. २१) याला अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली होती.

मिळालेल्या माहिती नुसार, किशोर पवार हा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घरात कोणास काही एक न सांगता निघुन गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नसल्याने त्याच्या पत्नीने २५ सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना किशोर पवार हा त्याचा मित्र अक्षय खिल्लारे याच्या दुचाकीवरुन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अक्षय खिल्लारे याला ताब्यात घेऊन चोकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी अक्षय खिल्लारे याचे किशोर पवार याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत किशोर याला माहिती झाल्याने तो दोघांवर संशय घेऊ लागला.

आरोपीने किशोरला फोन करुन माझ्या मित्राचा अपघात झाला आहे माझ्यासोबत चल असे खोटे सांगून दुचाकीवरुन वारक गावातील मुळशी डॅमच्या धरणाजवळ नेले. त्याठिकाणी लघुशंका करण्याचा बहाणा करुन सोबत आणलेल्या विळ्याने किशोरच्या मानेवर व चेहऱ्यावर वार करुन खून केला.

त्यानंतर मृतदेह कपड्याने बांधून मुळशी धरणाच्या पाण्यात टाकून दिला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!