Pimpri Chinchwad News : पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाचे अपहरण अन्… नंतर निर्घृण हत्या, दोन जणांना बेड्या
Pimpri Chinchwad News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pimpri Chinchwad News
पोलिस असल्याची बतावणी करून ६५ वर्षीय व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर बेल्टने मारहाण करत त्यांचा खून केला. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, टाकवे आणि चिंचवड येथे मंगळवारी (ता.३१) हा धक्कादायक प्रकार घडला. Pimpri Chinchwad News
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली. आर्थिक कारणावरून खुनाचा हा प्रकार घडला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .
श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय. ६५) असे हत्या करण्यात आलेलया ज्येष्ठ नागिरकांचं नाव असून, या प्रकरणी शिवाजी राजाराम गरूड (वय. ६५, रा. टाकवे) व अनिल शिवलिंग कोळी (वय. ४५, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात किरण शंकर खोल्लम (वय. ४८, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मयत टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे आहेत. टकले हे फिर्यादी खोल्लम यांच्या घरी असताना संशयित थेट घरात घुसले व त्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली. टकले यांना बळजबरी गाडीत बसवून चिंचवड येथे संशयित शिवाजी याच्या मुलीच्या घरी नेले.
तिथे पैशांच्या कारणावरून बेल्टने मारहाण केली. त्यानंतर त्यांना गाडीत बसवून मावळ तालुक्यातील टाकवे येथे नेले. तेथे मारहाण करून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, किरण खोल्लम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून तळेगाव दाभाडे पोलिसांनी संशयितांना अटक केली. या घटनेचा टॉप्स पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील करीत आहेत.