Pimpri Chinchwad Crime : धक्कादायक! सिमेंटचा गट्टू डोक्यात मारुन तरुणाचा खून, पिंपरी चिंचवड येथील घटना…


Pimpri Chinchwad Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंटचा गट्टू डोक्यात मारुन एका तरुणाचा खून केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता.१०) रात्री पावणे अकराच्या सुमारास मोशी बोऱ्हाडेवाडी येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

केतन निवृत्ती कोंढाळकर (वय. २७, रा. पिंपरीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संदीप महादेव मांडवी (वय.४२) यांनी शनिवारी (ता.११) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार संदिप उर्फ सँडी दशरथ देशमाने (वय.२५ रा. केशवनगर, कासारवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. Pimpri Chinchwad Crime

सविस्तर माहिती अशी की, बोऱ्हाडेवाडी येथील वुडसविला फेज सोसायटी फेज-२ समोरील सार्वजनिक रोडवर एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञाताने सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून केला होता.

पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सरु करुन मृत देहाची ओळख पटवली. केतन कोंढाळकर याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपी निष्पन्न केला. पोलिसांनी संदिप देशमाने याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरदवाड करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!