Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक खुन्नस वाढल्याने व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या, घटनेने पिंपरी- चिंचवड हादरले…


Pimpri Chinchwad Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच गोळीबाराच्या घटनेत देखील वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्या आहेत.

या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय.१९, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणेला (रा. जाधववाडी, चिखली) अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. Pimpri Chinchwad Crime 

सविस्तर माहिती अशी की, अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते.

या वादातून हर्षल सोनवणेनं दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. सुदैवाने अजय फुले हा बचावला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!