Petrol Pump Latest News : मोठी बातमी! राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चा बोर्ड, वाहनचालक धास्तावले..

Petrol Pump Latest News केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यात बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशभरातील वाहनचालकांनी तीन दिवसांसाठी संप पुकारला आहे. परिणामी अनेक ठिकाणी अवजड वाहने रस्त्यावरच उभी आहेत.
वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्याचबरोबर भाजीपाला, दूध, फळे यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर एका रात्रीत झपाट्याने वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
पेट्रोल मिळेल की नाही या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या. परिणामी राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून सकाळपासूनच पंपावर ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत. Petrol Pump Latest News
दरम्यान पेट्रोल पंपापर सकाळपासून नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. सिडको भागातल्या सगळ्या पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच नो स्टॉकचे बोर्ड लागल्यामुळे ज्यांच्याकडे पेट्रोल- डिझेल नाही त्यांची आज अडचण होईल असं दिसत आहे.