पेट्रोल-डिझेलचे दर घटणार?


नवी दिल्ली : ९ राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपातीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे.

त्यामुळे महागाईत होरपळणा-या सर्वसामान्यांना काही अंशी का असेना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती नियंत्रणात आहेत. त्यामुळे तेल कंपन्याही तोट्यातून सावरल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत, अशी माझी विनंती आहे, असे पुरी म्हणाले. बनारसमधील गंगा घाटावर सीएनजी बोट रॅलीत ते बोलत होते. यावेळी पुरी यांनी ज्या राज्यांनी व्हॅट कमी केला नाही, त्यांनाही लक्ष्य केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती वाढत असताना केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते. परंतु काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला नाही. त्यामुळे त्या राज्यांमध्ये तेलाच्या किमती अजूनही चढ्याच आहेत, असेही ते म्हणाले.

या वर्षी ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये त्रिपुरा, मेघालय, नागालँडच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मेघालय, नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. सर्व राज्यांचे निकाल २ मार्चला जाहीर होणार आहेत. याशिवाय कर्नाटक, मध्य प्रदेश, मिझोरम, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणातही या वर्षाच्य अखेरीस निवडणुका होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेल कंपन्यांना आवाहन केले आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!