Petrol Diesel Price : नवीन वर्षात मोदी सरकार देणार मोठा दिलासा? पेट्रोल डिझेलचे दर होणार कमी?, महत्वाची माहिती आली समोर…

Petrol Diesel Price : हे वर्षही संपणार असून मात्र महागाई संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. खरे तर खाद्यपदार्थांपासून जीवनावश्यक वस्तूंपर्यंतच्या किमती गगनाला भिडल्या आहे. याच दरम्यान, सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२४ च्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारचा लवकरच पेट्रोल, डिझेलच्या किमतीत कपात करण्याचा विचार आहे. पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर ४ ते ६ रुपये कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लक्षणीय घट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राची ऑइल मार्केटिंग कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. सरकार आणि ऑइल मार्केटिंग कंपन्या इंधर दर कपातीचा समान भार उचलण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर १० रुपयांपर्यंत दरात कपात करू शकते.
इंधन दरात कपात केल्याने किरकोळ महागाईवाढीचा वाढलेला दरही कमी होईल जो नोव्हेंबरमध्ये ५.५५ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलाहोता तसेच पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात याबाबत नुकतीच चर्चा झाली आहे.
त्यानंतर याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे पर्याय सादर केले आहेत. ही दोन्ही मंत्रालये दर पंधरवड्याला इंधन दरांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करतात. Petrol Diesel Price
गेल्या तीन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७०-८० डॉलरच्या दरम्यान असल्याने केंद्र सरकार इंधन दर कपात करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, अशा परिस्थितीत सरकारने येत्या काही दिवसांत इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय जाहीर केल्यास सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी ठरेल, त्याचा थेट फायदा भाजप सरकारच्या सत्ताधाऱ्यांना होताना दिसत आहे.