Petrol Diesel Price : मोदी सरकार सर्वसामान्य लोकांना देणार मोठं गिफ्ट, पेट्रोल डीझेलचे दर होणार कमी, जाणून घ्या…

Petrol Diesel Price नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतीदेखील (Petrol Diesel Price) गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. अलीकडेच सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून मोठा दिलासा दिला आहे.

आता यानंतर पेट्रोल-डिझेलची आजची किंमत (Petrol Diesel Price ) कमी झाल्याची चर्चा आहे. याबाबत सरकार दिवाळीच्या आसपास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर ३ ते ५ रुपयांनी कमी करण्याची घोषणा करू शकते. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय होईल, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने अशी माहिती दिली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दटात दिलासा मिळाल्यास उत्पादन शुल्क किंवा व्हॅट कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, रशिया आणि सौदी अरेबियाने वर्षाच्या अखेरीस तेल उत्पादनात कपात केल्यामुळे सरकारसाठी हा निर्णय कठीण होऊ शकतो. याच कारणामुळे कच्च्या तेलाने १० महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात सरकारने १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. किरकोळ महागाई दरात वाढ होत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे पाहता आता केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी अंदाज बांधली जात आहे.