काही लोकं ८४ वय झालं तरी थांबायला तयार नाहीत, अजित पवार यांचं शरद पवार यांना रिटायर्ड मेंटचा सल्ला..!!
पुणे : समाजाच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो आहे. असे सांगत अजित पवारांनी पुन्हा एकदा सत्तेत सहभागी होण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तर काही लोक ८४ वय झालं तरी थांबायला तयार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले की , वय झाले कि, थांबायचे असते. पण काहीजण हट्टीपणा करतात. कुठे तरी थांबा, आम्ही कामे आम्ही कामे करायला समर्थ आहोत. कोरोनाच्या काळात मला काही जणांनी सल्ला दिला की, मंत्रालयात जाऊ नका कोरोना होईल. पण मेलो तरी चालेल लोकांची कामे करत राहणार, असा निर्धार करून मी रोज सकाळी ८ वाजता मंत्रालयात जात होतो.
राज्य सरकारमध्ये कर्मचारी ५८ वया मध्ये रिटायर्ड होतो. मात्र काही ८४ वय झालं तरी रिटायर्ड व्हायला तयार नाही. काही चुकलं तर सांगा ना आम्हाला. आम्ही चार चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. काही चुकत असले तर त्यांनी सांगितलं पाहिजे. पण ते वय झालं तरी थांबायला तयार नाही. असं म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे.