नवीन वर्षात भलतेच प्रकार, ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून १०० जणांना ताब्यात, पोलिसांची मोठी कारवाई..

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. ठाण्यात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावली आहे.
याबाबत घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी छापा टाकला आहे. पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून १०० जणांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाजवळ १०० लोक रेव्ह पार्टी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पार्टी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली. या छाप्यात पोलिसांनी १०० तरुणांना ताब्यात घेत अमली पदार्थ जप्त केले. धकाकदायक बाब म्हणजे यात पाच मुलींचा समावेश आहे.
दरम्यान, या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी एलएसडी,चरस ,गांजा,चिलीम,अल्कोहोल अशा विविध अमली पदार्थ होते. पोलिसांनी २५ मोटारसायकली जप्त केल्या आहे.
ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.