पवारांच गणित ‘तिथंच’ चुकलं?? शरद पवार ठाम राहिले असते तर १९९६ सालीच पंतप्रधान झाले असते, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट


मुंबई : राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, एच. डी. देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते.

प्रफुल्ल पटेल यांनी १९९६ सालच्या काही मोठ्या घडामोडी सांगितल्या आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, १९९६ साली देवगौडा यांचा पाठिंबा काँग्रेसच्यावतीने सीताराम केसरी यांनी काढून घेतला.

शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत शासन आपल्या दारी अभियान सुरू राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

असे असताना त्यावेळी सर्व लोक शरद पवार यांच्या पाठीशी उभे होते. त्यावेळी जर शरद पवार ठाम राहिले असते, तर देवगौडा यांच्यानंतर आय. के. गुजराल नाहीतर शरद पवारच देशाचे पंतप्रधान झाले असते, असेही ते म्हणाले आहेत.

लेट पण थेट! माॅन्सून ३ जुलैपासून संपूर्ण राज्य मुसळधार कोसळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांची विचारसरणी देखील जनतेला आवडते त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा होत असतात.

तरुणीला परराज्यातून नोकरीसाठी बोलावून नराधमांनी तिच्यासोबत केले  कृत्य, पुण्यात खळबळ..

असे असताना मात्र त्यांना अनेकदा पंतप्रधान पदावरून हुलकावणी दिली. ते अजूनही पंतप्रधान होतील असेही म्हटले जाते. यामुळे मात्र सतत चर्चा होत असतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!