पुण्यात पाषाण सूस रोडवर भीषण अपघात, अभियंता तरुणीचा मृत्यू…


पुणे : मोटारचालक संगणक अभियंता तरुणीचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने पाषाण-सूस रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

किर्ती कृष्णा माळवे (वय ४०, रा. इस्टीका सोसायटी, बाणेर) असे मृत्यु झालेल्या संगणक अभियंता तरुणीचे नाव आहे. या अपघातात मोटारचालक अभिक चॅटर्जी (वय २४, रा. पाषाण-सूस रस्ता) जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चॅटर्जी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोटारीतून पाषाण-सूस रस्त्याने घरी निघाले होते. ते वळण घेत असताना त्यांच्या मोटारीला पाठीमागून माळवे यांच्या मोटारीने जोरात धडक दिली होती.

दरम्यान, या अपघातात माळवे स्वत: गंभीर जखमी झाल्या. त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या अपघातात चॅटर्जी हेही गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!