पार्थ पवार अजित पवारांप्रमाणेच धाडसी; विधानपरिषदेतील निर्णयक्षमता आणि समर्थ वारसा चालविण्याचे कसबही अजित पवारांसारखेच; मंगलदास बांदल यांनी पाठिंब्याचा व्हिडीओ प्रसारित करून उडवली धमाल


पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्याच्या यशस्वी वाटाघाटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून विक्रम काकडे यांना उमेदवारी देऊ केल्यानंतर पक्षात झालेल्या नाराजीनाट्यानंतर पक्षात या निर्णयाने काहूर माजले आहे.

या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी पार्थ पवार यांच्या निर्णयाला समर्थन देऊन घेतलेल्या निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत केल्याने त्यांच्या भूमिकेला ‘धाडसी’ व अजित पवार यांचे प्रतिबिंब त्यांच्या कृतीत असल्याचे सांगून पार्थ पवार यांना खुले समर्थन दिले आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून राष्ट्रवादीने तरुण उमेदवार विक्रम काकडे यांना उमेदवारी देऊ केल्याने नाराजीचा भडका उडाला आहे. पार्थ यांचे मित्र व निष्ठावान या मुद्दावर पक्षात रणाकंद माजले आहे.या घडामोडीत पक्षाच्या काही जुन्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आता याच घडामोडींवर पार्थ पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनी समर्थन देऊ केले आहे. बांदल यांनी निर्णयाला धाडसी म्हणून दिवंगत नेते अजित पवार यांच्या राजकीय कार्यकिर्दीत सुरुवातीला शरद पवार यांच्या पश्चात निर्णय घेऊन त्यांनी राजकारणात अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती.

त्यावेळीही अनेक तत्कालीन पदाधिकारी अजित पवार नाराज यांच्यावर झाले.मात्र या भूमिकेने पक्षात चांगले निर्णय घडले पक्ष वाढण्यास निश्चित मदत झाली असल्याचे त्या कृतीत दिसले.

अजित पवार यांच्या पश्चात पार्थ पवार अशाच पध्दतीने त्यांचा वारसा चालवित असून हा निर्णय पक्षाला पुणे शहरात विशेष बळ मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पक्ष उभा करणे हाच या धाडसी कृतीतून संदेश जात असून चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या माध्यमातून संधी देणे हाच मुख्य उद्देश असून पार्थ पवार हे भविष्यात त्याच्यावर खडे उतरतील असा विश्वास बांदल यांनी व्यक्त करुन त्यांच्या समर्थनात पुढे आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!