पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक, मध्यरात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

मुंबई : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गाैरी पालवे गर्जे यांनी वरळीतील घरात आत्महत्या केली. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला गेला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली.

गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर धक्कादायक आरोप केली जात आहेत. पंकजा मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले. गाैरी गर्जेच्या आत्महत्येनंतर तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता वरळी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत अनंत गर्जेला अटक केली आहे. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा अधिक तीव्र झाली आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनंत गर्जेला रात्री १ वाजता वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले. गाैरी गर्जेने आत्महत्या केल्याची माहिती अनंत गर्जेनेच स्वतः तिच्या आई-वडिलांना दिल्याचे सांगितले जात आहे.

एवढेच नव्हे तर ही माहिती पंकजा मुंडे यांच्या आणखी एका पीएला फोनवर दिल्याचंही समोर आलं आहे. पंकजा मुंडेंनी कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रात पोलिसांनी योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया दिली होती.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जेचे किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढले. गाैरीला हे नाते समजल्यावर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास तिला सहन करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी गाैरीला अनंत गर्जेच्या नावासह गर्भपाताचा रिपोर्ट मिळाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
गाैरी गर्जे हिच्या कुटुंबियांकडून अनेक गंभीर आरोप अनंत गर्जे आणि त्याच्या बहीण भावावर करण्यात आली. किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत अनंतचे अफेअर सुरू होते आणि याची कल्पना गाैरीला लागली. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होता. हेच नाही तर गाैरीने त्याला माफही केले होते. मात्र, तो चॅटिंग करत असल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती त्रासात होती. हेच नाही तर गर्भपाताचा एक रिपोर्टही गाैरीला मिळाला होता. ज्यामध्ये पतीच्या नावे अनंत गर्जेचे नाव होते.
दरम्यान, गाैरीने या सर्व गोष्टींची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. गाैरीला अनंतने अनेकदा मारहाण केल्याचेही कळतंय. गाैरी आणि अनंत यांच्यातील सततच्या वादानंतर अचानक गाैरीचे आई वडील बीडहून थेट त्यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी गाैरीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वळ त्यांना दिसून आले. आता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला ११ वाजता कोर्टात हजर केले जाईल.