पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार?, पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या राजकीय जीवनात..
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा पक्षावर नाराज दिसत आहेत. इतकंच नाही तर खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. तसेच आता पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अशा चर्चा सुरू आहे.
आज (ता.३) भाजपचे दिवंगत दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे यांनी दमदार भाषण केलं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत जाणार का? या प्रश्नावर देखील भाष्य केलं आहे.
ते म्हणाल्या, पहिल्या पाच वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात जे अनुभव आले ते फार वेगळे आहेत, मी मनात साठवून काहीही ठेवत नाही, मी एकदम स्पष्ट भूमिका मांडत असते. मुंडे साहेबांनी भाजपला सत्ताशिखरावर पोहोचवलं.
माझे शब्द ठाम आहेत. राजकारणात कधी कधी कीर्तन केलं पाहिजे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी अमित शहा यांची भेट घेणार आहे. अमित शहा यांची भेट घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. अमित शहा माझे नेते आहेत. असे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.