धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अखेर पंकजा मुंडे बोलल्या, मोठं वक्तव्य करत म्हणाल्या, मंत्रिपदाची शपथ..

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, राजीनाम्याचे स्वागत करते. हा राजीनामा आधीच यायला हवा होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं.
ज्यांनी राजीनामा घेतला तो आधीच घ्यायला हवा होता, धनंजयनेही तो आधीच द्यायला हावा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आये दुरुस्त आए, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, काल संतोष देशमुखांच्या हत्या करतानाचे काही क्रूर व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यावर संपूर्ण राज्य हादरलं आणि राजकीय घडामोडींना वेग आला. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह काही महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले.
तसेच पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख यांच्या आईची, कुटुंबियांची त्यांनी माफीही मागितली. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे, क्रूरपणे हत्या करून त्यांचा जीव घेण्यात आला. त्या घटनेला 82 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतर आज मुंडे यांनी राजीनामा दिला.
देशमुख यांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे. बीडमध्ये कराडची मोठी दहशद आहे. तो सगळा कारभार बघत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.