Pandurang Sakpal : उद्धव ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला, पांडुरंग सकपाळ यांचे निधन..


Pandurang Sakpal : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शिवसेनामध्ये जेव्हा फुट पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी इमान राखत पांडुरंग सकपाळ यांनी आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं दाखवून दिलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. Pandurang Sakpal

       

एक कट्टर शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची दक्षिण मुंबईत ओळख होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली.

विभागप्रमुख पद काढून घेतल्यानंतर पांडुरंग सकपाळ कोणत्याच कार्यक्रमात सक्रिय दिसले नाहीत. त्यांनी अनेक आंदोलन गाजवली आहेत. पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केली होती, यामुळे यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यांच्या निधनाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!