पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, भारताने घेतले ५ सर्वात मोठे निर्णय..

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध करत आता थेट कारवाईची भूमिका घेतली आहे. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काय आहेत निर्णय? जाणून घ्या..
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळणार नाही
सिंधु पाणी कराराला स्थगिती
पुढच्या ४८ तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश
अटारी बॉडर बंद करण्यात आली
पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं
पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं मोठं पाऊल उचलले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल परराष्ट्र मंत्रालयाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सिंधु पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे.
अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पुढच्या ४८ तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर आता सरकार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.
जम्मू काश्मीरमधील तब्बल १५०० लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, यापूर्वी ज्यांचा दहशतवादी कारवायांशी संबंध आला होता, किंवा जे संशयित आहेत, अशा लोकांना चौकशीसाठी तब्यात घेण्यात आलं आहे. तसेच या दहशतवाद्यांना ज्यांनी आश्रय दिला होता, त्यांचा देखील शोध सुरक्षा एजन्सीकडून सुरू आहे. दहशतवादी कारवाया मागील स्लिपर सेलचा देखील शोध सुरू आहे.