राज्यातील ११ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर!! मनोहर जोशी, पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण, जाणून घ्या…

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. तर गायक पंकज उदास, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातूनही अनेकांची वर्णी लागली.
यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील पद्मभूषण जाहीर झाला आहे. १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालेला आहे. पैकी तिघे जण महाराष्ट्राचे आहेत. एकूण १९ जणांना यंदा पद्मभूषण जाहीर झालेला आहे. एकूण ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यात ११ जण महाराष्ट्रातील आहेत.
या पुरस्कारांमध्ये कला, सामाजिक कार्य, विज्ञान, इंजिनीअरिंग, व्यापार, उद्योग, शिक्षण, क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्त्वांना या पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. यामध्ये आता घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोफ सराफ, गायिका अश्विनी भिडे देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, गायिका जसपिंदर नरुला, साहित्यिक मारुती चितमपल्ली, बासरी वादक राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा, चित्रकार वासुदे कामत, डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.