मोठी बातमी! पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार हाणामारी, नेमकं घडलं काय?


मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आमदार आणि विरोधक सभागृहात जनतेच्या प्रश्नांसाठी एकमेकांवर आगपाखड करत असतात, आपला मुद्दा आक्रमकपणे मांडत असतात, असे साधारण चित्र आजवर दिसत असे.

तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. काल दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती.

त्याचं रुपांतर आज हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होत आहे.

काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडखळकरांना डिवचलं होतं. आता, या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, या पायऱ्यांवरील मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!