त्या बॅनरला मनावर घेऊ नका, अतिउत्साही कार्यकर्ते असे बॅनर लावतात : अजित पवार


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित दादा भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लावण्यात आले होते. यावर राजकीय वर्तुळातून खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना आता खुद्द अजित पवार यांनी बोलून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री.., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..’ अशा आशयाचे मजकूर असलेले होर्डिंग मुंबईत लावण्यात आले होते . यावर बोलताना ,अजित पवार म्हणाले, याला मनावर घेऊ नका, महत्त्व देऊ नका. जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही. तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. कोणीही उठेल भावी पंतप्रधान असे बॅनर लावेल. अतिउत्साही कार्यकर्ते असे बॅनर लावतात. मात्र लोकशाहीत अतिउत्साहापेक्षा मॅजिक फिगर 145 ला महत्त्व आहे.

निलेश लंके यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी या शक्यता फेटाळून लावल्या होत्या. शरद पवार म्हणाले, कोणाला काहीही आवडेल. पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना . त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य वाटत नाही.असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!