पुण्यात हत्येची मालिका सुरूच! जागेच्या वादातून एका तरुणाचा खून, तीन सराईत गुन्हेगारांनी केला खून..

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न वारंवार विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे पुण्यात हत्येची मालिका सुरूच असल्याचे समोर आले आहे.
अशातच पुण्यातील आंबेगाव परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रज भागातील संतोषनगर भागात जागेच्या वादातून तीन सराईत गुन्हेगारांनी खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे कात्रज भागात खळबळ उडाली आहे.
शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर अमर साकोरे आणि इतर दोघे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये रविवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास शुभम चव्हाण हा घरी जात होता.त्यावेळी अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी शुभम याला थांबून जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली.
त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि शुभम हा तेथून पळून जाऊ लागला.त्यावेळी आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी, दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्या मारहाणीत शुभम चव्हाण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी अमर साकोरे आणि त्याचे साथीदार पळून गेले आहेत.या प्रकरणातील तीन ही आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आली असून जागेच्या वादातून शुभम चव्हाण याचा खून केल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.