खामगावटेक ते हिंगणगाव नदीवरील कोसळलेल्या पुलाच्या कामाचे चौकशीचे आदेश; काम गुणवत्तेत झाले की नाही चौकशी होणार; ‘पीएमआरडीए’ कडून पडलेले बांधकाम नव्याने करण्याचे निर्देश..

उरुळीकांचन : मुळा-मुठा नदीवरील खामगावटेक ते हिंगणगाव (ता.हवेली) या दरम्यान उभा राहत असलेल्या चालू बांधकाम स्थितीत असलेल्या पुलाचे काम गर्डर कोसळून पुल जमीनदोस्त झाल्याच्या प्रकारानंतर पुणे क्षेत्रविकास प्राधिकरणाने या पुलाच्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले असून संबंधित कंपनीला उर्वरीत चालू काम सुस्थितीत असल्याचा निर्वाळा करण्यासहीत नव्याने
काम करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
खामगावटेक ते हिंगणगाव या गावांना जोडणाऱ्या या पुलाचे काम चालू स्थितीत गर्डन जमीनदोस्त झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुलाचे काम हे जमिनदोस्त झाल्याने पुलाच्या चालू कामाचा दर्जावर प्रश्नचिन्ह नागरीक करीत आहेत. पीएमआरडीएने २४ कोटी रुपये मंजुर करुन या पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करुनही चालू बांधकाम सुरू असताना पुलाचे स्लॅब टाकणारे गर्डन जमीनदोस्त झाल्याने या पुलाच्या कामावर संशय निर्माण होत आहे.

या पुलाच्या गर्डनचा भाग कोसळल्यानंतर पुलाच्या गुणवत्तेचा प्रश्न नागरीकांनी विचारला असताना गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या दरम्यान या पुलाच्या कोसळल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पीएमआरडीच्या अभियांत्रिकी विभागाने कार्यकारी अभियंता स्नेहा हबू यांनी पथकासह पुलाच्या कामाला भेट दिली असून वापरलेल्या साहित्याची व केलेल्या कामाची तपासणी केली आहे.


दरम्यान बांधकाम चालू स्थितीत कोसळलेल्या या कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून मेसर्सटी.अँन्ड.टी इंन्फ्रा लि.पुणे या कंपनीने केलेल्या या कामाची चौकशीचे आदेश देऊन नव्याने काम करण्याचे आदेश पीएमआरडीच्या अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता शिवकुमार बागडे यांनी दिले आहेत.