Onion Rate : शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बसणार फटका! आता कांद्याचे भाव रोखण्यासाठी सरकारने आखला मास्टर प्लॅन…


Onion Rate : नवरात्रौत्सवानंतर देशभरात कांद्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे १४ रुपयांनी वाढले आहेत. कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे.

पुढील महिन्यापासून बाजारात बफर स्टॉक आणण्यात येणार आहे. यामुळे कांद्याचे दर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक मधील लासलगाव बाजारपेठेत १५ दिवसांपूर्वी घाऊक कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३,३५० रुपये होते. परंतु, बुधवारपासून त्यात वाढ होऊन ते प्रतिक्विंटल ४,८०० रुपये झाले आहेत. Onion Rate

तसेच कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी सरकारने याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के अतिरिक्त शुल्क लावले होते. एवढंच नाही तर नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.

दरम्यान मागील १५ दिवसांत लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापाठोपाठ राज्यभरातील इतर बाजारपेठांमध्ये सुद्धा उत्तम प्रतीच्या कांद्याची कमाल किंमत 50 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.

नवीन खरीप कांदा सुमारे दोन महिन्यांनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहण्याची शक्यता आहे. राज्यभरात १० दिवसांपूर्वी कांद्याचा सरासरी भाव ३५ रुपये किलो होता, तो आता ४५ रुपये किलो झाला आहे.

बाजारात चांगला भाव मिळत असून कांदा उत्पादकाला आनंद आहे. मात्र, ग्राहक महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!