शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीनंतर कांदा बाजारात तेजी, ‘या’ मार्केटमध्ये मिळाला एवढा भाव, जाणून घ्या….


मुंबई : नुकताच दिवाळीचा सण साजरा झाला असून दिवाळी सणाच्या काळात बंद असणाऱ्या राज्यातील अनेक बाजार समित्या पुन्हा एकदा शेतीमालाच्या लिलावासाठी सुरू झाल्या आहेत. तसेच दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे.

आज राज्यात कांद्याला कमाल ६५०० रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.

दरम्यान, येथील बाजारात आज १०० क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली होती. या कांद्याला आज येथे किमान ३०००, कमाल ६५०० आणि सरासरी ५५०० असा दर मिळाला आहे. फक्त वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येचं असा विक्रमी भाव मिळाला असे नाही तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला चांगला जबरदस्त दर मिळाला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज २४७१ क्विंटल कांदा आवक झाली होती. या कांद्याला कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज किमान १०००, कमाल ६३०० आणि सरासरी ३०००असा दर मिळाला आहे. याव्यतिरिक्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.

पुणे एपीएमसी मध्ये आज ६७०१ क्विंटल कांदा आवक झाली असून आजच्या लिलावात कांद्याला किमान दोन हजार, कमाल ५५०० आणि सरासरी ३७५० असा दर मिळाला आहे. खरे तर दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

दरम्यान, पण आता पुन्हा एकदा बाजार समिती सुरू झाल्या असून बाजारात कांद्याला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव फारच समाधानी असून सध्या मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नुकसान सहन करावे लागले होते ते नुकसान भरून काढता येईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!