धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटची एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने भोसकून केली हत्या, बारामती-पाटस मार्गावरील घटना..!!


दौंड : महाराष्ट्र बँकेच्या वसुली एजंटची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील वासुंदे हद्दीतुन समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण मळेकर (वय ३०, रा. गुरुवार पेठ, आधार काँप्लेक्स फ्लॅट नंबर ३०१, युको बँकेचे समोर कस्तुरी चौक, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत प्रवीण मळेकर यांचा मुलगा ऋषिकेश याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तींच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण मळेकर हे शनिवार सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास हिरो होंडा प्याशन मोटारसायकल यावरून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बारामती या बँकेचे रिकव्हरीचे नोटीस वाटप करण्यासाठी राहत्या घरातून बारामती परिसरात गेले होते. ते नोटीस बजावून घरी जात असताना रात्री पावने आठ वाजण्याच्या आसपास कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने हल्ला करून कोणत्या तरी अज्ञात कारणाने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केला आहे.

दरम्यान, प्रवीण मळेकर यांना उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड हे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!