राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकेत, १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण..


पुणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे दिसत आहे. राज्यात १३ ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाचा जोर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र आता पुन्हा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार ऑगस्टपर्यंत राज्यात तुरळठिकाणी पाऊस पडला होता. मात्र 4 ऑगस्ट पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. माहितीनुसार राज्यांमध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत असल्याचे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दरम्यान, कोकण भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १५ऑगस्ट पासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीने राज्यांमध्ये कमी वेळेमध्ये अधिक पाऊस होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!