शाळेच्या शिपयाचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार ; पिडीत मुलीने जीवन संपविले….!!
नवी मुंबई : राज्यात कायदा कडक करूनही गुन्हेगारीला (Criminality) आळा बसला नाही. दररोज कुठे ना कुठे गुन्हा घडत असतो. काही गुन्हेगार गुन्हा करून खूप टोकाचा निर्णय घेतात. नवी मुंबईतील (Navi Mumbai) शाळेतील शिपायाने एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण इथपर्यंतच थांबले नाही. या आरोपीने मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत शिपाई असणाऱ्या आरोपीने 17 वर्षीय मुलीशी मैत्री केली. यानंतर त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केलं. आरोपीच्या त्रासाला कंटाळून मुलीने 28 नोव्हेंबरला घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला गोवंडीतून अटक केली आहे. या आरोपीविरोधात कलम 305 (अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडणे), 376 (2) (वारंवार अत्याचार) लहान मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.