धक्कादायक ! कदमवाकवस्ती येथे बोगस डॉक्टरवर लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ! तब्बल पाच वर्षे चालवत होता क्लिनिक ..!!


 लोणी काळभोर : मागील 5 वर्षापासून जनसेवा क्लिनिक या नावाने बोगस दवाखाना थाटून नागरिकांना लुटणाऱ्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका बोगस डॉक्टरवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. ११) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रकाश रंगनाथ तोरणे (वय ६३, सध्या रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. मूळ रा. पढ़ेगाव, ता. श्रीरामपूर, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. रुपाली रघुनाथराव भंगाळे (वय-३८, रा. कालेपडळ, हडपसर, पुणे) यानी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुपाली भंगाळे या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात. डॉ. भंगाळे या नेहमीप्रमाणे गुरुवारी आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करीत होत्या. तेव्हा हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांचा डॉ. भंगाळे यांना फोन आला की, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड रस्त्यावर इसम नामे प्रकाश तोरणे याच्याजवळ वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहीत्य व औषध गोळ्या विनापरवाना बाळगून आहे. स्वतः डॉक्टर असल्याची बतावणी करून नागरिकांना जनसेवा क्लिनिक या दवाखान्यात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्या माहितीची खातरजमा करण्यासाठी, विस्तार अधिकारी डॉ. महेश वाघमारे, डॉ. रुपाली भंगाळे व समुदय आरोग्य अधिकारी डॉ. मनोज उबरे हे लोणी काळभोर पोलिसांना घेऊन सदर ठिकाणी गेले. प्रकाश तोरणे यांना डॉक्टर असल्याबाबत व औषध-गोळया विक्रीबाबत महाराष्ट्र कौंसिल ऑफ मेडीसिन या परिषदेचे प्रमाणपत्राबाबत विचारणा केली.
नेहा तोरणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो डॉक्टर असल्याचे कोणतीही शैक्षणीक पात्रता अथवा पदवी नसल्याचे समोर आले. तसेच प्रत्येक रुग्णाच्या पाठीमागे ७५ ते १०० रुपये फी घेत असल्याचे तोरपणे याने उन्बुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याजवळील वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारे साहित्य व औषय गोळ्या जपन करून दवाखाना सील केला आहे.

दरम्यान, मागील पाच वर्षापासून बोगस दवाखाना चालवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश तोरणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!