मुलानी संभाळले नाही, सुनेने वृध्दाश्रमात टाकले, मग बापानेही सगळी जमीनच राज्यपालांच्या नावावर केली….!

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा गावातील नत्थूसिंह यांनी आपली साडेअकरा एकर जमीन राज्यपालांच्या नावे केली आहे. २० वर्षापूर्वी पत्नीचं निधन झालं आणि मुलगा व सुनेने काही वर्षातच आपली वागणूक बदलल्याने त्यांनी हा अफलातून निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. त्यांनी कोर्टातही मुलाविरोधात खटला दाखल केला. तेव्हा न्यायाधिशासमोरच अशा मुलाला गोळ्या घातल्या पाहिजेत असे वक्तव्य केले. याचीही चर्चा जास्त झाली.
दरम्यान, त्यांनी आपली जमीन राज्यपालांच्या नावावर केली आहे. नत्थूसिंह यांच्या एका मुलाचे निधन झाले असून आताचा मुलगा शिक्षक आहे. शिक्षकाचेच संस्कार चुकीचे निघाल्याने बापाने हे पाऊल उचलले आहे.

तसेच बापाने एक मृत्यूपत्र लिहिले आहे. यामध्ये आपले अंत्यसंस्कारही मुलाने करू नयेत असे मृत्यूपत्र नत्थूसिंह यांनी केले आहे. मुलाने त्यांना वृध्दाश्रमात देखील ठेवले. काही दिवस त्यांनी फुटपाथवर दिवस काढले.