लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, बहिणी संतापल्या, पैसे दिलेच कशाला? अशी भावना…

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे बहिणी संतापल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात हा आकडा अजूनच वाढू शकतो.
त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. राज्यात चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल ९ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. अपात्र ठरणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती आहे.
यामुळे या बहिणींना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सध्या विरोधक राज्य शासनावर जोरदार टीका करत आहेत. सध्या ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणं सुरूच राहणार आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी एक ट्वीट देखील केले आहे. यामध्ये त्यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. दिनांक २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये नवीन निकष असे आहेत की, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीचा दाखलाही जोडावा. दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी करावी लागणार. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे.