आता Gmail वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे! नवीन नियम लवकरच होणार लागू…


पुणे : स्मार्टफोनमध्ये गूगलच्या जीमेल सेवेचे जगभरात मोठया संख्येने वापरकर्ते आहेत. जीमेल हे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक माणसाकडे असते. कामाच्या ठिकाणी जीमेल हे संवादाचे अतिशय सोयीचे माध्यम समजले जाते. यामुळे अनेकांची कामे मार्गी लागतात.

असे असताना आतापर्यंत गूगलकडून ही सेवा फ्री मध्ये दिली जात होती. मात्र आता ही फ्री सेवा बंद होऊ शकते. अगामी काळात गूगल जीमेल सेवा पेड करण्याची शक्यता आहे. यामुळे आता वापरकर्त्यांना यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

गूगलने आता जीमेलवर जाहिरात दाखवायला सुरुवात केली आहे. तुम्ही जीमेल ओपन केला की जाहिराती दिसणार आहेत. जीमेलची वापरकर्ते संख्या जास्त असल्याने यापुढे त्यावर मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखवल्या जातील.

युट्युबप्रमाणे जीमेलवर जाहिरात दाखवत पैसे कमावणार आहे. अगामी काळात या जाहिराती हटवण्यासाठी जीमेल वापरकर्त्यांकडून ठराविक पैसे सुद्धा आकारु शकते.यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!