आता पुस्तक समोर ठेवून देता येणार परीक्षा!! नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा…

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं सोबत ठेवण्याची परवानगी असणार आहे.
विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंडळाने सांगितले आहे की, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणेल अशी अपेक्षा आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर न देता, संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल.
परीक्षेचं ताण कमी करून संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर आता भर दिला जाणार आहे. मुलांना विषयांची सखोल माहिती मिळण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले आहे. याबाबत आता काहींनी हा निर्णय चुकीचा असल्याचे देखील सांगितले आहे.
यावर शिक्षकांना वाटते की, ही नवी पद्धत विद्यार्थ्यांमध्ये चिंतनशील विचारांना चालना देईल. पायलट अभ्यासामध्ये काही अडचणी आल्याचे मान्य करण्यात आले असले शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेता, CBSE च्या गव्हर्निंग बॉडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत परिणाम दिसून येतील.
आता CBSE ओपन बुक परीक्षांसाठी सैंपल पेपर्स तयार करण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. यावर पालकांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परीक्षेनंतर याबाबतचे परिणाम दिसून येणार आहेत.